सर्वात प्रथम अमृत पॅटर्न म्हणजे काय.?
शेतकरी मित्रानो अमृत पॅटर्न पद्धत ही शेती क्षेत्रात नवीन क्रांती करणारी व तसेच सर्वाधिक उत्पादन देणारी पद्धत आहे या पद्धतीचा उगम यवतमाळ जिल्ह्यात अंबोडा या गावांमधून श्री अमृत रावजी दादा रोजी देशमुख यांच्याकडून झाला यांनी स्वतःच्या शेतामध्ये वेग वेगळे प्रयोग करून प्रत्येक पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेतले जसे की
1) कापूस एकरी 22 क्विंटल पासून 51 क्विंटलपर्यंत घेतले घेतले.
2) सोयाबीन एकरी 10 क्विंटल पासून 22 क्विंटल पर्यंत
3) तूर एकरी 12 पासून ते 22 क्विंटल एवढे उत्पादन घेतले
4) हरभरा एकरी 15 पासून ते 24 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले
5) उन्हाळी भुईमूग एकरी 15 पासून ते 32 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले
अशा अनेक पिकांमध्ये त्यांनी खूप सारे नवीन प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले उदा.
1) लागवडीची व पेरण्याची दिशा कोणती असायला हवी
2) दोन्ही तासातील अंतर दोन्ही झाडातील अंतर किती असायला हवे
3) जास्तीत जास्त झाडाची संख्या कोणत्या अंतर पद्धतीमध्ये बसते
4) प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश व हवा मोकळी असणे महत्त्वाचे यावर जास्तीत जास्त भर
5) खताचे संपूर्ण नियोजन पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळे
शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने पाच ते सात राज्यांमध्ये शेती केल्या जाते आणि या पद्धतीचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होत आहे अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने विक्रमी उत्पादन खूपच कमी खर्चा मध्ये घेतलेले आहे या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या महाग औषधाची stimulnt ची वर खताची टॉनिक ची शिफारस केली जात नाहीत यामध्ये सर्वाधिक उत्पादन येण्याचे महत्त्वाचे कारण सर्वात प्रथम शेणखत प्रक्रिया ही आहे अंतरा चे नियोजन सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचे आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये बघायला मिळेल
दृष्टिकोन_
या पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी लागणारा खर्च खूपच कमी प्रमाणात येतो.
या पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारचे वर खत, टॉनिक, स्तीमुलंत, विद्राव्य खत ,वापरण्याची शिफारस केलेली नाही..
आपण या पद्धतीने जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण नियोजन केले तर, नक्कीच आपल्याला विक्रमी उत्पादन मिळू शकते..
प्रत्येक शेतकऱ्याने अमृत पॅटर्न पद्धतीने कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन याचा लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून अमृत पॅटर्न ची निर्मिती केलेली आहे..
शेतकरी मित्रांनो आपल्याला विनंती आहे की पारंपारिक पद्धत सोडून आपण प्रत्येक पिकाचे उत्पादन अमृत पॅटर्न पद्धतीने घ्यावे हीच विनंती / अपेक्षा धन्यवाद..
अमृतराव देशमुख🙏